न्हावरे (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : न्हावरे गावात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरीला गेला. प्रकाश गंगाधर कोरेकर यांच्या मालकीचा ट्रॅक्टर त्यांच्या घरासमोर उभा होता. चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात ट्रॅक्टर चोरून नेला. गावात आठवड्यात ही दुसरी चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकत्याच घडलेल्या पीकअप जीप चोरीच्या घटनेनंतर पुन्हा एका ट्रॅक्टर चोरीची घटना समोर आली आहे.
ही घटना २८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली. प्रकाश गंगाधर कोरेकर यांच्या घरासमोर अंगणात उभ्या असलेल्या निळ्या रंगाच्या न्यू हॉलंड ट्रॅक्टर (MH 12 GN 8212) आणि काकरपाळी अवजार असे एकूण २ लाख रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.
कोरेकर यांनी याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांना पकडून ट्रॅक्टर परत मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कुठलीही संशयास्पद माहिती मिळाल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Social Plugin