पुणे, (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती, जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या शासकीय जयंती सोहळ्यासाठी राज्याचे अनेक प्रमुख नेते, मंत्री आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम भिवडी, ता. पुरंदर, जि. पुणे येथील हुतात्मा उमाजी नाईक विद्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. रविवारी सकाळी ११ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल.
या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यांच्यासोबत महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे यांचीही उपस्थिती राहणार आहे.
या सोहळ्याला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक आमदार आणि खासदार उपस्थित राहून राजे उमाजी नाईक यांच्या कार्याला अभिवादन करतील. जय मल्हार क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी सर्व समाजाला कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
Social Plugin