Ticker

6/recent/ticker-posts

आंधळगाव फाटा येथे भटक्या विमुक्त समाजासाठी शिबिर


शिरुर (सुधीर खोमणे,  प्रतिनिधी): शिरूर महसूल विभागाच्या वतीने न्हावरे (आंधळगाव) येथे भटक्या विमुक्त समाजासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विविध सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा, हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.

शिबिरात एकूण १२० अर्ज प्राप्त झाले, ज्यांची तात्काळ छाननी करून संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले आहेत. अशी माहिती मंडल अधिकारी प्रशांत कांबळे यांनी दिली.

विविध विभागांचा सहभाग

पुणे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय अधिकारी व शिरूर तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले. यात पुरवठा विभाग,  संजय गांधी विभाग, महसूल विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, भूमी अभिलेख आणि ग्रामपंचायत अशा अनेक विभागांनी सहभाग घेतला. यामुळे नागरिकांना एकाच छताखाली विविध सरकारी सेवांचा लाभ घेणे शक्य झाले. शिबिरात आधार कार्ड, सेतू नागरी सुविधा केंद्र यांसारख्या सेवा देखील उपलब्ध होत्या.

शासनाच्या योजनांचा लाभ

या शिबिरात नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्रे, ओळखपत्रे, दाखले आणि आदेश वितरीत करण्यात आले. भटक्या विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आणि त्यांना कोणत्याही सरकारी कागदपत्रांपासून वंचित राहू नये याची खात्री करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

यावेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सरकार भटक्या विमुक्त समाजाला सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध आहे. त्यांना घरकुल आणि इतर सरकारी सुविधांचा लाभ दिला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. या शिबिराला सर्व शासकीय अधिकारी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी आणि भटक्या विमुक्त समाजातील नागरिक उपस्थित होते.

क्रांती संस्थेचे कार्यकर्ते, स्वयंसेवक यांनी भटक्या विमुक्त आदिवासी नागरिकांच्या वाड्या-वस्त्यांवर जावून सदर शिबिरात उपस्थित राहुन आपल्या समस्यांची सोडवणूक करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने भटक्या विमुक्त आदिवासी समुदायातील नागरिक माझ्या संस्थेने उपस्थित होते. त्यातील काही नागरिकांना रेशनकार्ड वाटप करण्यात आले. शिक्ररचे तहसिलदार श्री. बाळासाहेब म्हस्के यांच्या माध्यमातून शेकडा भटक्या विमुक्तांच्या बांधवांना रेशनकार्ड, मतदानकार्ड, जातीचे दाखले इ. मिळाले आहेत व अनेक समस्यांची सोडवणूक झाली आहे. असे क्रांती संस्थेच्या प्रमुख सुनीता भोसले यांनी प्रतिपादन केले.