शिरूर (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे पुणे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालय, शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या विमुक्त जमातींसाठी एक दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, 31 ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता साईनाथ मंगल कार्यालय, आंधळगाव फाटा, ता. शिरूर येथे सुरू होणार आहे.
शिबिरात भटक्या विमुक्त जमातीतील नागरिकांना विविध सेवा पुरवण्यात आल्या, ज्यामध्ये जातीचा दाखला, आधार कार्ड नोंदणी, मतदार नोंदणी, आरोग्य विभागाशी संबंधित सेवा आणि पुरवठा विभागाच्या सेवा मोफत देण्यात येणार आहे. या शिबिरात अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून विविध योजनांचा लाभ घेतला.
या शिबिराला पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी (भा.प्र.से.), अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, उपविभागीय अधिकारी श्रीमती. पूनम अहिरे, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, आणि गटविकास अधिकारी महेश डोके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरामुळे भटक्या विमुक्त जमातीतील नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध होतील.
0 Comments