Ticker

6/recent/ticker-posts

३१ ऑगस्ट आता 'भटके विमुक्त दिवस' म्हणून साजरा होणार; महाराष्ट्र शासनाचा निर्णय

शिरुर, (सुधीर खोमणे,  प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने ३१ ऑगस्ट हा दिवस 'भटके विमुक्त दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात इतर मागास बहुजन कल्याण विभागाने ३१ जुलै २०२५ रोजी एक शासन निर्णय (GR) जारी केला आहे. हा कार्यक्रम साईनाथ मंगल कार्यालय आंधळगाव फाटा येथे सकाळी 10 वा

दिनांक 31/08/2025

१९ व्या शतकात, विशेषतः १८७१ साली, ब्रिटिश सरकारने Criminal Tribes Act लागू केला होता, ज्या अंतर्गत काही जातींना 'गुन्हेगार' म्हणून घोषित करण्यात आले होते. या कायद्यामुळे त्या समाजाला स्वातंत्र्यपूर्व काळात मोठ्या प्रमाणात अन्याय आणि अत्याचार सहन करावा लागला.

स्वातंत्र्यानंतर, ३१ ऑगस्ट १९५२ रोजी हा जुलमी कायदा रद्द करण्यात आला आणि या समाजाला 'विमुक्त जाती' (म्हणजे 'मुक्त झालेल्या' जाती) म्हणून ओळख मिळाली. या समाजाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्र उभारणीमधील योगदानाचा सन्मान करण्यासाठी ३१ ऑगस्ट हा दिवस 'भटके विमुक्त दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

कार्यक्रमाचे स्वरूप:

 हा दिवस राज्य आणि जिल्हा स्तरावर साजरा केला जाईल.

 या दिवशी भटक्या-विमुक्त समाजाची संस्कृती, जीवनमूल्ये आणि परंपरा दर्शवणारे विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि माहितीपर कार्यक्रम आयोजित केले जातील.

शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा तसेच वसतिगृहांमध्ये विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबिर, आधारकार्ड नोंदणी आणि जातीचे व जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांविषयी माहिती देण्यासाठी शिबिरांचे आयोजन केले जाईल.

 ३१ ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी, शनिवार किंवा रविवारची साप्ताहिक सुट्टी किंवा स्थानिक सुट्टी असली तरीही हा दिवस साजरा केला जाईल.

या कार्यक्रमांसाठी १० लाख रुपयांपर्यंतचा खर्च करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना त्यांच्या विभागातील व जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना आवश्यक सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.