न्हावरे (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील श्री गणेश मंदिराचे कलशारोहण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा सोमवारी (दिनांक २५/०८/२०२५) मोठ्या उत्साहात होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
न्हावरे येथील प्रभाग क्रमांक २, कोळीवाडा येथील श्री गणेश मंदिरामध्ये हा शुभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १२ वाजून ११ मिनिटांनी कलशारोहण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापना विधी संपन्न होणार आहे. यानंतर सर्व भाविकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा संपूर्ण कार्यक्रम श्री स्वामी समर्थ तरुण मित्र मंडळ, न्हावरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. मंडळाने या सोहळ्यासाठी सहकार्य करणाऱ्या आणि देणगी देणाऱ्या सर्व दात्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
Social Plugin