Ticker

6/recent/ticker-posts

शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहिल्यासच त्यात यश मिळवता येईल - योगेश गाडे

न्हावरे, (सुधीरखोमणे,  प्रतिनिधी) : शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहिले तरच त्यात यश मिळवता येईल, असे आवाहन योगेश गाडे यांनी न्हावरा येथे कृषी विभागाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात केले. इतर कोणत्याही क्षेत्रात यश मिळाले नाही म्हणून पर्याय म्हणून शेतीकडे पाहू नये, असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी कांदा रोपवाटिका, कांदा लागवड तंत्रज्ञान, हुमणी नियंत्रण आणि जैविक औषधांचा वापर यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. कांदा रोपवाटिका करताना कोणती काळजी घ्यावी आणि कांदा चाळीत साठवण्याची क्षमता कशी वाढवावी, याबद्दलही त्यांनी माहिती दिली.

या कार्यक्रमात गावचे उपसरपंच सुभाषराव कोकडे यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सहायक कृषी अधिकारी जयवंत भगत यांनी या योजनांची सविस्तर माहिती दिली. प्रा. गोविंद राजेनिंबाळकर यांनी जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी जैविक उत्पादनांचा वापर करण्याचे महत्त्व सांगितले.

या कार्यक्रमाला प्रा. गोविंद राजेनिंबाळकर, उपसरपंच सुभाषराव कोकडे, अशोक राजेनिंबाळकर, लक्ष्मण खेडकर, भानुदास सात्रस सर, अनिल ठिकेकर, लक्ष्मण निंबाळकर, गणेश काकडे, दिनेश गायकवाड, प्रताप कोरेकर, गजानन कोरेकर, गोरख भोंडवे, शंकर खेडकर, प्रमोद कोरेकर, संतोष गायकवाड, शरद पवार, संभाजीराव कांडगे, गणेश काळे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल गावडे यांनी सहकार्य केले, तर जयवंत भगत यांनी उपस्थितांचे आभार मानले.