न्हावरे, (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : तालुक्यातील न्हावरे येथे सोमवारी (दि.१७) सकाळी नऊच्या दरम्यान न्हावरे चौफूला या राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी भीषण घटना घडली. महामार्गाच्या कडेला असणाऱ्या वीजवितरण कंपनीच्या विद्युत रोहित्राला भरधाव वेगात एका चार चाकी वाहननाने धडक दिल्याने विजेची रोहित्र कोसळून शॉट सर्कीट झाले. त्यामुळे रस्त्याच्या बाजूलाच असणाऱ्या त्रिमूर्ती प्लास्टीक होलसेल दुकानाने पेट घेऊन यामध्ये कोट्यावधी रूपयाचे नुकसान झाले आहे.
या आगीत गुलाब पडवळ यांचे मालकीच्या दुकानाचे नुकसान झाले आहे. ही आग काही क्षणातच लागल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी रांजणगाव, कारेगाव औद्योगिक वसाहतीतील तसेच शिरूर नगरपरिषद यांच्या अग्निशमन पथकातील कर्मचारीवर्गाचे प्रयत्न सुरू आहे. घटनास्थळी परिसरातील ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त होत आहे. तसेच रस्त्याच्या कडेला वीजवितरण कंपनीने डिपी बसवू नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Social Plugin