न्हावरे, (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : जय मल्हार क्रांती संघटनेच्या लढ्याला अखेर यश आलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. राजे उमाजी नाईक यांचे इतिहासातील स्थान अढळ आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलतनाना हारुबाई उमाजी शितोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार मानले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील समाज प्रबोधन करणारे, साहित्यिक, व्यक्ती व संस्था यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार देणार असल्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळात निर्णय होऊन १३ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाचा जीआर काढण्यात आला. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे महाराष्ट्रातील तमाम रामोशी, बेरड, बेडर व बहुजन समाज जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर आभार मानण्यात आले.
Social Plugin