Ticker

6/recent/ticker-posts

'शिवसेना शिरूर तालुका उपसंघटक'पदी बाळकृष्ण वाघचौरे यांची नियुक्ती



शिरूर, (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाचा विस्तार वाढतच चालला आहे. आता फक्त मोठे नेतेच नाही तर कार्यकर्तेही मोठ्या संख्येने शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत आहेत. शिरूर तालुक्यातील धडाडीचे कार्यकर्ते बाळकृष्ण विश्वनाथ वाघचौरे यांची 'शिवसेना तालुका उपसंघटक' पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे शिरूर तालुकाप्रमुख रामभाऊ बबनराव सासवडे यांनी वाघचौरे यांना नियुक्तपत्र दिले.


हिंदुहृदय सम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्यनेते मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने, शिवसेना सचिव संजयजी मोरे व शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, शिवसेना तालुकाप्रमुख शिरूर तालुका श्री रामभाऊ सासवडे यांच्याशी विचार विनिमय करून आपली 'शिवसेना तालुका उपसंघटक ' पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. आपण पुढील काळात शिवसेना प्रमुखांचा आदेश अतिंम मानून शिवसेना पक्षाच्या ध्येय-धोरणावर निष्ठा ठेवून प्रामाणिकपणे कसोटीने पक्ष बांधणी करून सामाजिक कार्य करावे. याकामी आपल्या आई तुळजाभवानी मातेने उदंड आयुष्य आरोग्य व शक्ती द्यावी, ही प्रार्थना, असे पत्र बाळकृष्ण वाघचौरे यांना देण्यात आले आहे.