Ticker

6/recent/ticker-posts

ओंकार अरुण रामदासी यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी जाहीर

 


न्हावरे, (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : येथील ओंकार अरुण रामदासी यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी जाहीर झाली आहे. त्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत भौतिकशास्त्र विषयात संशोधन केलं होतं.

ओंकार अरुण रामदासी यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर कठीण विषयातील आपलं संशोधन पूर्ण केलं. त्यांनी भौतिकशास्त्रातील "स्ट्रक्चरल फेरोइलेक्ट्रिक, डायइलेक्ट्रिक अँड पिझोइलेक्ट्रिक प्रॉपर्टीज ऑफ BaTiO3-Bi0.5Na0.5TiO3-Bi0.5K0.5TiO3 टर्नरी सॉलिड सोल्युशन फॉर पिझोइलेक्ट्रिक ॲप्लिकेशन" या विषयावरील शोध प्रबंध सादर केला. डॉ. राहुल कांबळे व प्रो.येसप्पा कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रामदासी यांनी संशोधन पूर्ण केले. डॉ.ओंकार रामदासी सध्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय,मुंबई येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.