शिरूर
: (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : शिरूरच्या लेकीने तालुक्याच्या शिरपेचात
पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे. मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे सुरू
असलेल्या शालेय राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये पोद्दार इंटरनॅशनल
स्कूलची विद्यार्थीनी ओवी निलेश पवार हिने सुवर्णपदक मिळवले आहेत. १
जानेवारी ते ७ जानेवारी २०२५ दरम्यान भोपाळ मध्य प्रदेश येथे सुरू असलेल्या
शालेय राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये भारतातून एकूण ३३ राज्यांतील
एकूण ११८८ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धा ओपन साईट रायफल,
पीपसाईट रायफल व एअर पिस्टल या ३ खेळ प्रकारात संपन्न झाल्या. त्या
स्पर्धेमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल (शिरूर) ची विद्यार्थीनी ओवी निलेश
पवार हिने महाराष्ट्र राज्य संघाचे १४ वर्षे वयोगटातील १० मी पीपसाईट एयर
रायफल खेळ प्रकारात महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करत महाराष्ट्र
संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. ती सध्या श्री छत्रपती संभाजी शिक्षण
संस्थेतील युनिक शूटिंग स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये शरद तरटे सर यांच्या
मार्गदर्शनाखाली गेल्या एक वर्षापासून सराव करत आहे.
सुवर्ण पदक
मिळविल्याबद्दल आमदार माऊली आबा कटके, शिरूर पंचायत समितीचे माजी उपसभापती
माननीय राजेंद्रजी जासूद ,पोद्दार इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचे प्राचार्य नीरज
राय सर, संभाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रजी थिटे साहेब व तिचे
आजोबा मेजर शहाजी पवार आदी मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले तसेच पुढील
स्पर्धेकरता शुभेच्छा दिल्या.
Social Plugin