Ticker

6/recent/ticker-posts

स्थानिक निवडणुकीत महायुतीसोबत जाणार; लोकनेते दौलतनाना शितोळे यांनी जाहीर केली भूमिका


शिरूर, (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : नुकतेच लोकनेते दौलतनाना शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली जय मल्हार क्रांती संघटनेची सांगोला येथे वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत अनेक ठराव पास करण्यात आले. तसेच नवीन कार्यकारणीही जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिरूर येथे पत्रकार परिषद संपन्न झाली. यामध्ये सभेत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती देण्यात आली.

जय मल्हार क्रांती संघटनेची राष्ट्रीय कार्यकारणीची माहिती देताना संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन नायक लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब म्हणाले की महाराष्ट्रातील सर्व भटके विमुक्त जाती जमाती ओबीसी अशा छोट्या मोठ्या लहान घटकांना सोबत घेऊन त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढा देणार आहोत. या सर्व या सहकाऱ्यांनी या सभेत एक ठराव पास केला आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजप महायुती बरोबर सर्वांनी राहण्याचा एक मुख्य ठराव पास करण्यात आला. तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जय मल्हार क्रांती संघटना सर्व ताकदीने जागा लढवणार असल्याचे घोषणा करण्यात आली. तसेच मी शिरूर तालुक्याचा भूमिपुत्र असल्याने शिरूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून शिरूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करणार असेही दौलतनाना शितोळे साहेब म्हणाले.



तसेच वंजारी महासंघ महाराष्ट्र, लिंगायत सेवा संघ महाराष्ट्र, अहिल्यादेवी होळकर विचार मंच महाराष्ट्र, वैदू समाज, कोळी समाज, नाभिक सेना, मातंग नवनिर्माण सेना या संघटना जय मल्हार क्रांती संघटनेची संलग्न नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे ही सांगितले.