Ticker

6/recent/ticker-posts

निर्वीचे ग्रामसेवक सुरेश साळवेंच्या पाठीवर कौतुकाची थाप; शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्याने सन्मान


न्हावरे (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : 'सरकारी काम आणि सहा महिने थांब' अशी म्हण तुम्हीही ऐकली असेल. अनेकदा छोट्याशा कामासाठीही सरकारी कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात. मात्र, त्यात काही कर्मचारी असेही असतात की ज्यामुळे त्या पदाची शोभा वाढते. अशाच एका कर्तव्यपरायण ग्रामसेवकाचा सन्मान करण्यात आला. केंद्र व राज्य शासनाची घरकुल महत्त्वाकांक्षी योजनेचा ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबीयांना लाभ मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. 

तालुक्यातील निर्वी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी सुरेश साळवे यांचा पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी विकास अधिकारी डोके साहेब आणि विस्तार अधिकारी माकरताईं यांनी सन्मानित केले. पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिरूर येथे पंचायत समितीची नुकतीच आढावा बैठक घेतली. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा यावेळी त्यांनी आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.


शिरूर तालुक्यातील निर्वी ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी सुरेश साळवे यांनी आपल्या कार्यकाळात शासनाच्या विविध योजना ग्राम पातळीवर यशस्वीरित्या राबवून सर्वसामान्यांना त्याचा फायदा मिळवून दिला. याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कौतुक करून त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. ग्रामविकास अधिकारी यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल निर्वी ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे. साळवे यांनी जनावरांचे गोठे, विहीर, शिलाई मशीन, पिठाची चक्की आदि योजना बरोबरच पंतप्रधान आवास योजना व रमाई घरकुल योजना याची प्रभावी अंमलबजावणी केले आहे.