Ticker

6/recent/ticker-posts

न्हावऱ्यात जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान आयोजित रक्तदान महायज्ञ



 न्हावरे (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : जगात सर्वात श्रेष्ठ दान हे रक्तदान समजले जातात. कारण, इथे दाता आणि घेणारा ऐकमेकांना अपरिचित असतात. याच पार्श्वभूमीवर अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज- जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम ता. जि. रत्नागिरी (महाराष्ट्र) यांच्या कृपाआशीर्वादाने तसेच पीठाचे उत्तराधिकारी प.पु. कानिफनाथ महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने 4 जानेवारी 2025 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रासह अनेक राज्यात भव्य महारक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे.



दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील न्हावरे येथे शनिवार १८ जानेवारी 2025 रोजी सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन न्हावरे येथे भव्य-दिव्य महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी न्हावरे पंचक्रोशी मधील सर्व ग्रामस्थांनी या महारक्तदान शिबिराला उपस्थित राहुन रक्तदानाच्या महाकुंभामध्ये रक्तदान करून आपला पुण्यसंचय वाढवावा. एक रक्तदान केल्याने तीन जणांचे प्राण वाचू शकतात, असे आवाहन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबीर कैलास राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांनीही सहभाग घेतला.