Ticker

6/recent/ticker-posts

न्हावरे येथील तांबे वस्ती जिल्हा परिषद शाळेमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा

 


न्हावरे, (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबे वस्ती न्हावरे येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी परिसर दणाणून गेला. सहायक पोलीस निरिक्षक संदिप कोकरे यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. तर न्हावरे विकासे सोसायटीचे माजी चेअरमन धनंजय तांबे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.


कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त सेलचे शिरूर तालुका अध्यक्ष गोरखनाथ तांबे, न्हावरे गावचे माजी उपसरपंच अरुण तांबे, पीएसआय संदिप कोकरे, आबासाहेब कोकरे, आनंद कोकरे यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेतील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यास शाळेचे मुख्याध्यापक संतोष देवरे आणि उपशिक्षक जीवन हिरवे यांनी खूप मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदकुमार तांबे, उपाध्यक्ष संतोष तांबे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष गोरक तांबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाला उपस्थित असलेले अंगणवाडी सेविका मंगल गारगोटे, शितल तांबे, न्हावरे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी संचालक बाबुराव तांबे, ज्ञानोबा तांबे, मस्कू तांबे, शिवा बिचकुले, राहुल बिचकुले, शिवाजी कोळेकर, शिवाजी भिसे, बापू पडळकर आणि महिला भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक संतोष देवरे यांनी केले. उपशिक्षक जीवन हिरवे यांनी आलेल्या ग्रामस्थांचे आभार यांनी मानले. याप्रसंगी समस्त ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांनतर खावू वाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली.