शिरूर,(सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : शिरूर तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. आज शिरूर तहसीलदार कार्यालयात तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या उपस्थितीत तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या सोडतीमुळे गावागावातील राजकीय समीकरणे बदलणार असून, अनेकांना धक्का बसला, तर काहींना दिलासा मिळाला आहे.
तहसीलदार म्हस्के यांनी यावेळी माहिती दिली की, यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले होते. आज उर्वरित ८९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.
प्रमुख गावांची आरक्षण स्थिती
या सोडतीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या गावांचे सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले हे स्पष्ट झाले
माजी आमदार अशोक पवार यांचे गाव असणारे वडगाव रासाईचे सरपंचपद अनुसुचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.
स्वर्गीय माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या तर्डोबाचीवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले.
भाजप नेत्या जयश्री पलांडे आणि माजी आमदार काकासाहेब पलांडे यांचे गाव असणारे मुखईचे सरपंचपद अनुसुचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले.
औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे आणि जनता दल प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे व माजी पंचायत समिती सभापती विश्वास कोहोकडे यांचे गाव असणारे कारेगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाले.
कवठे येमाई आणि कान्हूर मेसाई या गावांचे सरपंचपदही ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.
शिरूर ग्रामीण, रांजणगाव गणपती, टाकळी हाजी या ग्रामपंचायतींचे सरपंचपद सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी आहे.
आरक्षित पदांची सविस्तर यादी
अनुसुचित जाती महिला प्रवर्गासाठी:
निमगाव म्हाळुंगी, मुखई, जांबूत, वढू बुद्रुक.
अनुसुचित जाती प्रवर्गासाठी:
आमदाबाद, गोलेगाव, वाजेवाडी, हिवरे.
अनुसुचित जमाती महिला प्रवर्गासाठी:
वडगाव रासाई, माळवाडी.
अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी:
कुरुळी.
नागरिकांचा मागासवर्ग महिला (ओबीसी महिला) प्रवर्गासाठी:
कर्डे, चव्हाणवाडी, म्हसे बुद्रुक, पिंपरी दुमाला, वाडा पुनर्वसन, सादलगाव, पिंपळसुटी, नांगरगाव, निमगाव भोगी, आलेगाव पागा, बाभूळसर बुद्रुक, पिंपळे जगताप, रावडेवाडी.
नागरिकांचा मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गासाठी:
कासारी, शरदवाडी, अण्णापूर, कारेगाव, मिडगुलवाडी, कोळगाव डोळस, वाघाळे, पारोडी, खंडाळे, फाकटे, कवठे येमाई, आंधळगाव, कान्हूर मेसाई.
सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी:
आंबळे, कळवंतवाडी, धानोरे, शिंदोडी, निमगाव दुडे, केंदुर, विठ्ठलवाडी, पिंपरखेड, गणेगाव दुमाला, बुरुंजवाडी, कोंढापूरी, टाकळी भीमा, चिंचोली मोराची, गुनाट, उरळगाव, शिक्रापूर, निर्वी, कोरेगाव भीमा, दरेकरवाडी, आपटी, न्हावरा, पाबळ, धामारी, जातेगाव बुद्रुक, डिंग्रजवाडी, खैरेनगर, मोटेवाडी, वरुडे, निमोणे, तर्डोबाचीवाडी.
सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी:
ढोकसांगवी, भांबर्डे, संविदणे, बाभुळसर खुर्द, चिंचणी, शिरूर ग्रामीण, काठापूर खुर्द, वडनेर खुर्द, शिरसगाव काटा, टाकळी हाजी, चांडोह, करंदी, रांजणगाव सांडस, तांदळी, मांडवगण फराटा, तळेगाव ढमढेरे, सोने सांगवी, दहिवडी, सणसवाडी, मलठण, रांजणगाव गणपती, सरदवाडी, इनामगाव, खैरेवाडी, जातेगाव खुर्द, गणेगाव खालसा, करंजावणे, पिंपळे खालसा.
या आरक्षणामुळे आता इच्छुकांना आपल्या नशिबाची चाचपणी करावी लागणार असून, नवीन चेहऱ्यांनाही संधी मिळणार आहे.
Social Plugin