Ticker

6/recent/ticker-posts

शिष्यवृत्ती परीक्षेत श्री मल्लिकार्जुन विद्यालयाचे घवघवीत यश!

न्हावरे, (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा २०२४-२५ मध्ये श्री मल्लिकार्जुन विद्यालय, न्हावरे येथील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. यंदा एकूण पाच विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण १९ विद्यार्थी पात्र ठरले होते, त्यापैकी दोन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत निवड मिळवली.

 कैवल्य हिराकांत बळीनवर याने २६२ गुण मिळवून गुणवत्ता यादीत २२६ वा क्रमांक पटकावला.

 राजवीर पद्माकर भोसले याने २५८ गुणांसह ३०२ वा क्रमांक मिळवला.

त्याचप्रमाणे, इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण १७ विद्यार्थी पात्र झाले होते, त्यापैकी तीन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.

 रुद्र दिनेश शेलार याने २५० गुण मिळवून गुणवत्ता यादीत १२१ वा क्रमांक पटकावला.

 सृष्टी नवनाथ बिडगर हिने २३६ गुणांसह २२६ वा क्रमांक मिळवला.

 जय अंकुश तांबे याने २१२ गुण मिळवून ५१३ वा क्रमांक प्राप्त केला.

या विद्यार्थ्यांच्या यशामागे मार्गदर्शक शिक्षकांचे मोठे योगदान आहे. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना श्री. दिनेश शेलार, श्री. मयूर ओतारी आणि श्रीमती भोईटे मॅडम यांनी मार्गदर्शन केले, तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना श्री. डॉ. अविनाश कामठे, श्री. दिनेश शेलार, श्री. दीपक गोरडे, श्री. विपुल राऊत आणि श्री. पद्माकर भोसले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे श्री मल्लिकार्जुन विद्यालयाकडून हार्दिक अभिनंदन!


Post a Comment

0 Comments