Ticker

6/recent/ticker-posts

दौलतनाना शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री दालनात सत्कार: मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा!

पुणे, (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात आदराने पाहिले जाणारे लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब यांच्या १७ जुलै रोजी येणाऱ्या वाढदिवसानिमित्त काल, १६ जुलै रोजी मुंबई मंत्रालयातील मुख्यमंत्री दालनात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दौलतनाना शितोळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांचा सत्कार केला.

यावेळी दौलतनाना शितोळे साहेब यांच्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते दौलतनानांचा सत्कार करण्यात आला, यावेळी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. मुख्यमंत्री दालनात दौलतनानांच्या कार्याचे आणि दूरदृष्टीचे कौतुक करण्यात आले.

या सत्कार सोहळ्यामुळे दौलतनाना शितोळे यांच्या कार्याची आणि त्यांच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा दखल घेण्यात आली. हे क्षण त्यांचे कार्य आणि महाराष्ट्राच्या विकासातील त्यांचे योगदान अधोरेखित करणारे होते.