Ticker

6/recent/ticker-posts

'महसूल सप्ताह' अंतर्गत न्हावरे येथे महसूल समाधान शिबिर संपन्न



न्हावरे, (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : शिरूर तालुक्यातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी 'महसूल सप्ताह' अभियानांतर्गत न्हावरे येथे 'श्री छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' आयोजित करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि शिरूर तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले.

या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महसूल विभागाव्यतिरिक्त बांधकाम विभाग, वन विभाग, पशुसंवर्धन विभाग, सहकार विभाग, ग्रामविकास विभाग आणि अभियंता विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या सर्व विभागांनी नागरिकांच्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे दिली आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

या शिबिरात सेतु (महा-ई-सेवा केंद्र) विभागामार्फत अनेक नागरिकांना विविध दाखले वितरित करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. काही नागरिकांनी त्यांच्या समस्या आणि तक्रारी मांडल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी या तक्रारींची नोंद घेऊन वेळेत कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.

या कार्यक्रमाला गावातील ज्येष्ठ नागरिक, शासकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी त्यांच्या विविध समस्यांवर उपाय मिळाल्याने समाधान व्यक्त केले.