उरळगाव, (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात उरळगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतातून लाखो रुपयांची डाळिंबे चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काढणीला आलेल्या डाळिंबाची चोरी झाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
१.५१ लाख रुपयांची डाळिंबे गायब
उरळगाव येथील रहिवासी असलेले शेतकरी अमोल बाळासाहेब आफळे यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आफळे यांच्या शेतातून १ लाख ५१ हजार २०० रुपये किमतीची डाळिंबे चोरीला गेली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जून ते २२ जून या दहा दिवसांच्या कालावधीत ही चोरी झाली आहे. चोरट्यांनी शेतातून अंदाजे १५५९ किलो पिकलेली डाळिंबे चोरून नेली.
या चोरीमुळे शेतकरी अमोल आफळे हवालदिल झाले आहेत. डाळिंबाचे पीक काढणीसाठी तयार असतानाच ही चोरी झाल्यामुळे त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.
Social Plugin