Ticker

6/recent/ticker-posts

अज्ञात टेम्पो चालकाच्या धडकेत महिलेचा मृत्यू; शिरूरजवळची घटना

शिरूर, (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : पुणे-अहमदनगर महामार्गावरील कारेगाव येथील फलके मळा परिसरात मंगळवारी एका भीषण अपघातात ३३ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिची दोन मुले जखमी झाली. हा अपघात एका भरधाव टेम्पो आणि ॲक्टिवा स्कुटी यांच्यात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती गणेश सावंत (वय ३३, रा. गंगा फेज ३, जुडिओ मॉलमागे, शिरूर) असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात त्यांची मुलगी स्वराली सावंत (वय १२) आणि मुलगा स्वराज सावंत (वय १५) हे जखमी झाले आहेत.

सिद्धार्थ इंद्रभान गिरमकर (वय २८, रा. उरळगाव, शिरूर) यांनी यासंदर्भात अज्ञात टेम्पो चालकाविरोधात फिर्याद दिली आहे. एमएच १५ जीव्ही ७१८२ क्रमांकाच्या अशोक लेलँड कंपनीच्या टेम्पो चालकाने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात वाहन चालवून एमएच १२ पीए ६४५१ क्रमांकाच्या ॲक्टिवा स्कुटीला मागून जोरदार धडक दिली.

हा अपघात काल (४ जून) कारेगाव, फलके मळा येथील चौकातील दुभाजकाजवळ झाला. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून पळून गेला. शिरूर पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस इन्स्पेक्टर चव्हाण या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.