न्हावरे(सुधीर खोमणे, प्रतिनिधी) ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तात्याबा ठकाजी शेंडगे (वय ६२) यांचे आज (सोमवार) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने न्हावरे गावावर शोककळा पसरली आहे.
तात्याबा शेंडगे यांनी ग्रामपंचायतीमध्ये अनेक वर्षे सक्रिय योगदान दिले होते. माजी उपसरपंच म्हणून त्यांनी गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते. त्यांच्या निधनाने गावाने एक अनुभवी लोकप्रतिनिधी गमावला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Social Plugin