Ticker

6/recent/ticker-posts

बच्चुभाऊंच्या आरोग्यासाठी शिरूरमध्ये 'प्रहार'ची प्रार्थना! आंदोलन यशस्वी झाल्याचा आनंद साजरा



शिरूर (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : दिव्यांगांचे कैवारी आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चुभाऊ कडू यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेले गेले ७ दिवसांपासूनचे उपोषण अखेर यशस्वी झाले आहे. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारच्या वतीने लेखी आश्वासन दिल्यानंतर, बच्चुभाऊ कडू यांनी आपले उपोषण स्थगित केले. या यशामुळे राज्यभरातील दिव्यांगांसह शिरूरमध्येही कार्यकर्त्यांनी मोठा आनंद व्यक्त केला.

बच्चुभाऊ कडूंच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, यासाठी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था आणि प्रहार पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने आज शिरूर येथे विशेष प्रार्थना करण्यात आली. रामलिंग महाराजांना दुग्धाभिषेक घालून महाआरती करण्यात आली.

यावेळी प्रहार पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय तरटे, व्यवस्थापक महेंद्र निंबाळकर, संस्थापक व संचालक तुषार हिरवे, मनिष सोनवणे, रामदास भुजबळ आणि स्वातीताई निंबाळकर यांनी सपत्नीक रामलिंग महाराजांना अभिषेक घालून महाआरती केली. बच्चुभाऊ कडूंची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी त्यांनी देवाला साकडे घातले.

बच्चुभाऊंच्या आंदोलनाला मिळालेल्या यशामुळे आणि त्यांनी उपोषण सोडल्याच्या बातमीने शिरूरमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी ज्योती गोसावी, नयना परदेशी, सुनील नरसाळे, सूरज गुप्ता, अमोल माळवदकर, शीतल कोतवाल, कान्होपात्रा मंबडवाड, तन्वी कोतवाल, रेखा कोतवाल यांसह अनेक प्रहार सेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बच्चुभाऊंच्या अथक प्रयत्नांना यश मिळाल्याने दिव्यांगांचे प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.