न्हावरे, (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या पोलीस दलात एक अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली आहे! कोकण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळाला आहे. विशेष म्हणजे, या कामगिरीचे श्रेय न्हावरेरचे सुपूत्र खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे प्रभावी प्रमुख आणि कोकण विभागातील पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले विक्रम कदम यांना जाते.
विक्रम कदम यांच्या नेतृत्वाखालील या कार्यालयाने राज्याच्या पोलीस प्रशासनात सर्वोच्च स्थान मिळवले आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
'१०० दिवसांचे कार्यालय सुधारणा' कार्यक्रमाचे यश!
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या '१०० दिवसांचे कार्यालय सुधारणा' कार्यक्रमाचा हा एक भाग होता. या कार्यक्रमांतर्गत कार्यालयांच्या कामात सुधारणा आणणे, कार्यक्षमतेत वाढ करणे आणि नागरिकांना उत्तम सेवा देणे हे उद्दिष्ट होते. या पडताळणीमध्ये, कोकण विभागातील (रायगड हा कोकण विभागात येतो) सर्वोत्कृष्ट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय म्हणून विक्रम कदम यांच्या नेतृत्वाखालील रायगड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
विक्रम कदम यांना एसपी (जिल्हा पोलीस अधीक्षक) आंचल दलाल यांच्या हस्ते रायगड येथे गौरवण्यात आले. त्यांची ही कामगिरी न्हावरेकरांसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. ही कामगिरी पोलीस दलातील कार्यक्षमता, पारदर्शकता आणि नागरिक-केंद्रित सेवेचे महत्त्व अधोरेखित करते. विक्रम कदम यांच्या नेतृत्वाखालील या कार्यालयाने घालून दिलेला आदर्श इतर पोलीस कार्यालयांसाठी प्रेरणादायी ठरेल.
Social Plugin