Ticker

6/recent/ticker-posts

न्हावरे येथून इलेक्ट्रिक बाईक आणि रोख रक्कम चोरीला; ऊसतोड कामगारावर गुन्हा दाखल

न्हावरे, (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील निंबाळकर वस्ती येथे एका शेतकऱ्याच्या घरातून इलेक्ट्रिक मोटारसायकल आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ऊसतोड कामगार लखन पांडुरंग अडागळे याच्या विरोधात शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहन निवृत्ती सरके (वय ४३, रा. न्हावरे, निंबाळकर वस्ती) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, काल, २३ मे २०२५ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी मोहन सरके यांच्याकडे ऊसतोड कामगार म्हणून कामाला असलेल्या लखन पांडुरंग अडागळे (रा. पाणीटाकीजवळ, डोमलगाव, ता. अंबड, जि. जालना) याने त्यांच्या घरासमोरुन दुचाकी आणि घरातून रोख रक्कम चोरी केल्याचा आरोप आहे.

आरोपी लखन अडागळे याने बजाज कंपनीची चेतक इलेक्ट्रिक मोटारसायकल (पांढऱ्या रंगाची व हिरवी नंबर प्लेट असलेली, रजिस्ट्रेशन क्रमांक MH 12 XP 4407) चोरुन नेली. या बाईकची अंदाजे किंमत १,००,००० रुपये आहे. यासोबतच, त्याने कपाटात ठेवलेली रोख रक्कम १०,००० रुपये (५०० रुपयांच्या २० नोटा) देखील चोरली, असा त्याच्यावर आरोप आहे. चोरीला गेलेल्या वस्तूंची एकूण किंमत १,१०,००० रुपये आहे.

मोहन सरके यांनी २४ मे २०२५ रोजी दुपारी ३ वाजून २७ मिनिटांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) बनकर हे करत आहेत, तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) थेऊरकर यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.