Ticker

6/recent/ticker-posts

श्री मल्लिकार्जुन विद्यालयाचा एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत 100 टक्के निकाल



न्हावरे, (सुधीर खोमणे,  प्रतिनिधी) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचालित श्री मल्लिकार्जुन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने इयत्ता दहावीच्या (एस.एस.सी.) बोर्ड परीक्षेत यंदाही नेत्रदीपक यश संपादन केले आहे. शाळेचा निकाल १००% लागला असून, विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीतही आपले स्थान निश्चित केले आहे.

कु. भोसले प्रीती नितीन हिने ९५.२०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर कु. कुटे श्रेया शिवाजी ९४.६०% गुणांसह द्वितीय आणि कु. नलगे स्वराली महेश ९४.२०% गुणांसह तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. कु. भोसले ज्ञानेश विकास याने ९३.६०% गुण मिळवून चौथा क्रमांक प्राप्त केला. विशेष म्हणजे, कु. म्हाळसकर रुद्र गणेश आणि कु. शिंदे श्रेया गणेश या दोघांनीही ९३.००% गुण मिळवून पाचवा क्रमांक घेतला.

विद्यालयाच्या या यशाबद्दल प्राचार्य, पर्यवेक्षक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाचे आणि शिक्षकांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे फळ आहे, असे गौरवोद्गार मुख्याध्यापकांनी काढले. या निकालामुळे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.