न्हावरे, (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : तालुक्यातील न्हावरे गावात श्री हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या बुधवारी ९ एप्रिल २०२५ ते १२ एप्रिल २०२५ दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या चार दिवसीय सोहळ्यासाठी गावकऱ्यांनी कंबर कसली असून गावात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. श्री हनुमान मंदिर न्हावरे गावातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धारामुळे आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठेमुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण
दिनांक: ९ एप्रिल २०२५ ते १२ एप्रिल २०२५
स्थळ: श्री मारुती मंदिर, न्हावरे, ता. शिरूर, जि. पुणे
आयोजक: श्री हनुमान मंदिर समिती आणि श्री मल्लिकार्जुन भजनी मंडळ, न्हावरे
कार्यक्रमाचे स्वरूप:
या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हनुमान संगीत कथा, कीर्तन, भजन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा यांचा समावेश आहे. तसेच ह.भ.प. धीरज महाराज आळंदीकर, ह.भ.प. उमेश महाराज पौळ, ह.भ.प. कार्तिक महाराज परभणीकर आणि ह.भ.प. संतोष महाराज पवार (परभणी) आपली प्रवचन सेवा देणार आहेत.
अन्नदान :
या सोहळ्यात दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री. भानुदास (तात्या) उबाळे, श्री. गणेश लहानु बिडगर आणि श्री. प्रताप जयवंतराव हाडे यांनी अन्नदात्याची जबाबदारी घेतली आहे.
Social Plugin