Ticker

6/recent/ticker-posts

विजय लोखंडे यांना ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान



पुणे, (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : ध्येय एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने हडपसर(पुणे) येथे  'ध्येयतरंग' कार्यक्रमांतर्गत हवेली तालुक्याचे पत्रकार विजय ज्ञानेश्वर लोखंडे यांना राज्यस्तरीय 'आदर्श पत्रकार पुरस्कार' प्रदान करून गौरविण्यात आले. सहाय्यक कामगार आयुक्त अनिकेत थोरात यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. 

या कार्यक्रमाला हडपसरचे आमदार चेतन तुपे पाटील, फाउंडेशनचे संस्थापक सुदाम शेंडगे, राज्य मार्गदर्शक सोमनाथ शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त राहुल आवारे, योजना संचालनालयचे संचालक डॉ. महेश पालकर, पालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुरेखा भंगे, ध्येय प्रकाशन अकॅडमीच्या संस्थापिका अर्चना शेंडगे, सचिव सोनाली गाडे, राज्यप्रमुख संदीप पाटील, सारिका शिंदे, उर्मिला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

गेले १८ वर्ष झाले कमी वयात पत्रकारितेचे काम सुरू करून हवेली तालुक्यात आदर्श पत्रकारिता करीत विजय लोखंडे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाच्या अनेक सार्वजनिक समस्या सोडविण्यासाठी बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडत जनतेच्या समस्या मार्गी लावल्या असून सर्वसामान्यांना पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी कायम लेखणीच्या माध्यामतून आवाज उठवण्याचे काम केले आहे.लोखंडे यांचा याआधी आपल्या आदर्श बातमीदारी तसेच उत्तम कार्य व कामांच्या जोरावर अनेक आदर्शवत पुरस्काराने त्यांचा गौरव झाला आहे.समाजात त्यांची स्टार पत्रकार नावाने ओळख निर्माण झाली आहे.