न्हावरे, (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : मंगळवारपासून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली आहे. यंदा दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा सुरू होत असल्याने परिक्षार्थींच्या मनात धाकधुक सुरू असल्याचे पाहायला मिळतेय. या पार्श्वभूमीवर निमोणे येथील नागेश्वर विद्यालयाच्या प्राचार्यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. परीक्षा काळात विद्यार्थांनी आरोग्यांची काळजी घ्यावी, असे आाहन प्राचार्य तुकाराम बेनके यांनी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही केलं.
नागेश्वर विद्यालय निमोणे येथे इयत्ता दहावीच्या शुभेच्छा समारंभात अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थांना शुभेच्छा देताना शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके यांनी इयत्ता दहावीचे शिक्षण आता उच्च शिक्षणाला दिशा देणारे ठरणारे आहे. त्यामुळे परीक्षा काळात सकस आहार घ्यावा आणि आरोग्यांची उत्तम काळजी घ्यावी व परीक्षेस आत्मविश्वासाने सामोरे जावे आणि आपल्या विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लावला अशी अपेक्षा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाव्हुणे ज्ञानगंगा विद्यालयाचे सी.ई.ओ. नितीन घावटे, सरपंच सुषमा काळे, प्राध्यापक वसंत शिंदे,शिरगिरे सर, शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत काळे प्राध्यापक एन बी मुल्ला व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थिति मध्ये कार्यक्रम संपन्न झाला. विद्यार्थी मनोगतात मुलांनी शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करत भविष्यात शाळेसाठी मदत करणार असल्याचं सांगीतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणात मुख्याध्यापक राजाराम ढवळे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेवून सर्वांचे स्वागत केले.सुत्रसंचलन शरद दुर्गे यांनी तर आभार मिसाळ सर यांनी मानले.
Social Plugin