न्हावरे, प्रतिनिधी : शिरूरच्या दोन विद्यार्थ्यांनी तालुक्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे ६ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या राज्यस्तरीय शालेय शूटिंग क्रीडा स्पर्धा २०२४-२५ मध्ये या दोघींनी घवघवीत यश मिळवलं आहे.
ओवी निलेश पवार (पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, शिरूर) हिने १४ वर्षे वयोगटात ४०० पैकी ३९१ गुण मिळवत रौप्यपदक पटकावले आहे. तर श्रावणी संतोष वाळके (कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, कारेगाव) हिने १७ वर्ष वयोगटात ४०० पैकी ३९६ गुण मिळवत कांस्यपदक पटकावले. भोपाळ व इंदोर, मध्यप्रदेश या ठिकाणी स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया (SGFI) यांच्यामार्फत होणाऱ्या राष्ट्रीय शालेय शूटिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली
दोघीही शिरूरच्या श्री. छत्रपती संभाजी शिक्षण मधील युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लब मध्ये मा. शरद तरटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक निरज राय, कारेश्वर इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका स्नेहलता यादव तसेच संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जी थिटे व इतर मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments