या शिबिरात विविध आजारांची तपासणी आणि उपचार विशेष तज्ञांच्या माध्यमातून केले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने महिलांची उच्च रक्तदाब, मधुमेह, तसेच तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भाशय ग्रीवेचा कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांची तपासणी केली जाईल. या व्यतिरिक्त किशोरवयीन मुलींसाठी पोषण, मासिक पाळी आणि रक्तक्षय (ॲनिमिया) तपासणी तसेच समुपदेशन उपलब्ध असेल.
गर्भवती महिलांसाठी प्रसूतीपूर्व काळजी, तपासणी आणि औषधोपचार सेवा दिल्या जातील, तर लहान मुलांसाठी लसीकरणाची सोय आहे. तसेच अवयवदान, PMJAY नोंदणी, आयुष्यमान वंदना कार्ड आणि निक्षय मित्र स्वयंसेवकांची नोंदणी यासारख्या विविध आरोग्य योजनांचा लाभही महिलांना या शिबिरात मिळणार आहे.
या मोफत आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त महिला आणि मुलींनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामीण रुग्णालय, न्हावरा येथील वैद्यकीय अधीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी केले आहे.
Social Plugin