शिरूर, (सुधीर खोमणे, प्रतिनिधी : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील जिल्हा परिषदेच्या गटांसाठी आणि पंचायत समितीच्या गणांसाठी ही सोडत काढण्यात आली असून, यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण महिला यांच्यासाठीचे गट निश्चित झाले आहेत.
विशेषतः शिरूर पंचायत समितीच्या १४ गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद गट आरक्षण (तालुक्यानुसार)
१. नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) साठी आरक्षित झालेले गट:
तालुका | गट क्र. | आरक्षित गट |
हवेली | ३७ | पेरणे |
वेल्हे | ५५ | वेल्हे बुद्रुक |
खेड | २५ | मेदनकरवाडी |
मुळशी | ३६ | पिरंगुट |
शिरूर | २० | मांडवगण फराटा |
दौंड | ४९ | यवत |
आंबेगाव | १३ | अवसरी बुद्रुक |
भोर | ५६ | वेळू |
२. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (OBC Women) साठी आरक्षित गट:
तालुका | गट क्र. | आरक्षित गट |
खेड | २२ | कडूस |
बारामती | ६० | सुपा |
हेवली | ४० | थेऊर |
शिरूर | १५ | न्हावरा |
जुन्नर | ४ | राजुरी |
जुन्नर | ६ | नारायणगाव |
जुन्नर | २ | ओतूर |
पुरंदर | ५३ | नीरा शिवतक्रार |
जुन्नर | ५ | बोरी बुद्रुक |
इंदापूर | ६७ | पळसदेव |
आरक्षण महिलांसाठी आरक्षित
१. अनुसूचित जाती महिला (SC Women) साठी आरक्षित गट:
इंदापूर - ७१ (लासुरने)
इंदापूर - ७० (वालचंदनगर)
बारामती - ६१ (गुणवडी)
हवेली - (लोणीकाळभोर)
२. अनुसूचित जमाती महिला (ST Women) साठी आरक्षित गट:
जुन्नर - ८ (बारव)
जुन्नर - १ (डिंगोरे)
आंबेगाव - ९ (शिनोली)
३. सर्वसाधारण महिला (General Women) साठी आरक्षित गट:
यामध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक २१ गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. यात खेड (२३-रेटवडी), दौंड (४७-पाटस), बारामती (६३-वडगाव निंबाळकर), शिरूर (१९-तळेगाव ढमढेरे), इंदापूर (६९-निमगाव केतकी), मावळ (३१-खडकाळे), आंबेगाव (११-कळंब), हवेली (३८-कोरेगाव मुळ), आणि पुरंदर (५०-गराडे) यांसारख्या प्रमुख गटांचा समावेश आहे.
शिरूर पंचायत समितीच्या १४ गणांचे आरक्षणही यासोबतच जाहीर करण्यात आले आहे.
या आरक्षण सोडतीमुळे आता अनेक राजकीय इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या असून, निवडणुकीच्या तयारीला वेग येण्याची शक्यता आहे.
Social Plugin