Ticker

6/recent/ticker-posts

शिरूर येथील युनिक शूटिंग क्लबच्या १२ नेमबाजांचे पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

शिरूर, (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : शिरूर येथील छ. संभाजी शिक्षण संस्थेमधील युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लबमध्ये २८, २९ व ३० सप्टेंबर दरम्यान पुणे जिल्हा ग्रामीण शालेय नेमबाजी स्पर्धा २०२५ पार पडली. या स्पर्धेमध्ये युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लबच्या १२ नेमबाजांनी घवघवीत यश मिळवले.  त्यांची पुणे विभागीय शालेय नेमबाजी स्पर्धा २०२५-२६ साठी निवड झाली. ही स्पर्धा त्रिमूर्ती प्रतिष्ठान, नेवासा फाटा येथे ८, ९ व १० ऑक्टोबर दरम्यान पार पडणार आहे.

यशस्वी खेळाडू खालील प्रमाणे:-

१० मीटर पिपसाईट एअर रायफल:-

संदेश भोंडवे (१४ वर्षाखालील)

समृद्धी चव्हाण (१४ वर्षे)

ऋग्वेदा शिंदे (१४ वर्षे)

हर्ष वाळके (१७ वर्षे)

अभय पाटील (१७ वर्षे)

ओवी पवार (१७ वर्षे)

समीक्षा ढेरंगे (१७ वर्षे)

तेजस कांबळे (१९ वर्षे)

आर्यन शिनलकर (१९ वर्षे)

१० मीटर ओपन साईट एअर रायफल:-

वेदांत कदम (१४ वर्षे)

श्रेयस नागरगोजे (२४ वर्षे)

मोहम्मद अली सय्यद (१७ वर्षे).

सर्व खेळाडू संस्थेमधील युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लब मध्ये सराव करत आहेत. त्यांना प्रशिक्षक श्री. शरद तरटे सर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी थिटे, उपाध्यक्ष धनंजयजी थिटे, डी. फार्मचे प्राचार्य शहा सर, बी फार्मचे प्राचार्य कोठावदे सर, सायन्स व कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य सतीश पोटे सर, विजयमाला स्कूलच्या प्राचार्या मारिया साठे मॅडम, पडवळ सर, पोटावळे सर व इतर कर्मचारी वर्गाने यशस्वी खेळाडूंचे कौतुक केले  व आगामी होणाऱ्या पुणे विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.