Ticker

6/recent/ticker-posts

आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित: अनिकेत बेनके यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव

न्हावरे, (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : श्री. भैरवनाथ विद्यालय, आलेगाव पागाचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्राध्यापक श्री. अनिकेत संभाजी बेनके यांना नुकतेच जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पुणे जिल्ह्याच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुण्यातील वानवडी येथील महात्मा ज्योतिराव फुले सांस्कृतिक भवन येथे हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्ष नेते श्री. अंबादासजी दानवे साहेब आणि शिक्षक आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब तसेच शिक्षक सेनेचे ग्रामीण अध्यक्ष रामनाथ इथापे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते बेनके यांना हा पुरस्कार देण्यात आला.

शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी

प्रा. अनिकेत बेनके यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय आणि भरीव कामगिरी केली आहे. त्यांनी श्री. भैरवनाथ विद्यालयामध्ये अनेक नवनवीन उपक्रम यशस्वीपणे राबवले, ज्यामुळे विद्यालयाच्या लौकिकात भर पडली आहे. त्यांच्या याच कार्यामुळे ते विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात.

त्यांना हा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

अभिनंदन करणाऱ्यांमध्ये यांचा समावेश

प्रा. अनिकेत बेनके यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. आप्पासाहेब बेनके, विद्यालयाचे प्राचार्य श्री. तुकाराम बेनके, प्राध्यापक श्री. संतोष शेळके, श्री. देविदास कंठाळे, सिध्दार्थ गायकवाड, अवचिते, लाड सर, सुप्रिया काळभोर, शितोळे मॅडम, रोहिणी धुमाळ मॅडम तसेच सेवक आणि शिक्षकेतर कर्मचारी दीपक नाचन आणि अर्जून वेताळ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार मिळाल्यामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.